सामुदायिक विवाह सोहळा बैठक संपन्न
* 7 मे रोजी होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्या संदर्भात काल विवाह सोहळ्याचे कार्याध्यक्ष Ad किरण दैठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विवाह सोहळ्याच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली. बैठकीस विठ्ठल शहाणे,कोषाध्यक्ष Dr पवन चांडक,भीमराव वायवळ,Ad भालेराव सर,मधुसूदन जोशी,शरद लोहट आदी उपस्थित होते.बैठकीत विवाह सोहळ्या संदर्भात साधक बाधक चर्चा करण्यात आली.यात विवाह सोहळ्यात 50 विवाह लावण्याचे ठरवण्यात आले.*
सदरील विवाह सोहळ्याची प्रचार आणि प्रसिध्दी जिल्ह्यातील सर्व 9 तालुक्यात करण्याचे ठरवण्यात आले.रविवारी या संदर्भात प्रेस conferance घेण्याचे ठरले.
आतापर्यंत नोंदणी झालेल्या विवाह सोहळ्याचा आढावा घेण्यात आला. एकूण 25 हून अधिक विवाहाची नोंदणी झाली आहे.
एकूण 50 विवाहाच्या संदर्भाने खर्चाचा आढावा घेण्यात आला तसेच जोडप्यांना देण्यात येणाऱ्या साहित्या संदर्भात देखील चर्चा झाली.
साहित्यात मनिमंगळसूत्र,जोडवे,चैन,नवरदेव नवरीचे कपडे,ओढणी,टॉवेल टोपी,अंतरपाट, पाट,चौरंग,बाशिंग,भांडी,सतरंजी, चप्पल, बुट इत्यादी
तसेच भोजनाच्या संदर्भात एकंदरीत येणाऱ्या व्यक्ती आणि जेवणाचा मेनू ठरवण्यात आला.तसेच स्टेज,माईक system ,वाजंत्री,फोटोग्राफी इत्यादी विवाह सोहळ्यातील सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली.
शेवटी विठ्ठल शहाने सरांनी सर्वांनी सतत संपर्कात राहण्याचे सांगितले. शहाने सरांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व बैठक संपन्न झाली.