उदयलक्ष्मी’च्या प्रशिक्षण सत्राची झाली सुरुवात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी संचलित उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट परभणीच्या वतीने आयबीपीएस व बैंकिंग पूर्व प्रशिक्षण क्षेत्राची सुरुवात करण्यात आली.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी
केंद्राचे संचालक भीमराव वायवळ हे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद मिनगिरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात रणजीत पाटील, शिवानंद मिनगिरे यांनी मार्गदर्शन केले. भीमराव वायवळ यांनी प्रास्ताविक केले. दिलीप उबाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. माने यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी राम वायवळ, अक्षय परसोडे, सुभाष रगडे यांनी परिश्रम घेतले.