बार्टी पुणे संचलित उदयलक्ष्मी स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली च्या IBPS प्रशिक्षण सत्राची सुरवात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (Barti )पुणे संचलित
*उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट,हिंगोली च्या *आयबीपीएस ( IBPS) पूर्व प्रशिक्षण बॅच 2022-23 चे उदघाटन प्रा.संभाजी पाटील सर प्राचार्य दिलीप इंगळे प्रा कृष्णाजी इंगळे रवींद्रजी वाढे साहेब, ज्योतीपाल रणवीर ,बबन मोरे, पडघन सर, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा संभाजी पाटील सर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच प्रा.कृष्णा इंगळे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा परिपूर्ण लाभ घेऊन नियमितपणे क्लास करून मोठ,मोठय़ा पदावर जाण्यासाठी मार्गदर्शन केले. आणि
पुढील भावी शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी तिन्ही बॅचेस सर्व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन दहिफळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन
प्रा.संदीप भुक्तर सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केदारलींग चव्हाण, कृष्णा रंणबावळे सर, ढोकने सर, डोईफोडे सर, स्वप्निल पुंडगे यांनी परिश्रम घेतले….