उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट परभणी येथे 26 नोव्हें संविधान दिन साजरा
उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट परभणी येथे 26 नोव्हें संविधान दिन साजरा
दि.26 नोव्हें 2022 डॉ.बाबसाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संचलित *उदयलक्ष्मी स्पर्धा परीक्षा मार्गर्शन केंद्र,दर्गा रोड परभणी या ठिकाणी संविधान दिन हर्ष व उल्हसात साजरा करण्यात आला..
यावेळी उदयलक्ष्मी स्पर्धा परीक्षा केंद्र ते डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा स्टेशन रोड परभणी या दरम्यान रॅली काढण्यात आली.
उदयलक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्ट चे संचालक मा.आयु.भीमरावदादा वायवळ यांच्या हस्ते
भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली व नंतर सामुहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले..
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.भीमरावदादा वायवळ सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.परमेश्वर वांगकर सर,प्रा.ज्ञानेश्र्वर माने सर,प्रा.अरुण मस्के सर आणि प्रा.दिलीप उबाळे सर उपस्थित होते.
यावेळी IBPS BANKING च्या विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त आपले विचार मांडले.. यामध्ये स्वप्निल नंद, प्रशांत खंदारे,रवी भदर्गे प्रतिभा बोराडे , वैशाली जोंधळे ,अजय झोडगे शिवानंद वाघमारे ,यशवंत उजागर यांनी मनोगत व्यक्त केले तर
स्वप्नाली भिसे ,कीर्ती यादव आणि दिशा कनकुटे यांनी सुंदर असे गीत सादर केले
आध्यक्षीय समारोपामध्ये मा.भीमराव दादा वायवळ यांनी IBPS च्या विद्यार्थ्याना 26 नोव्हे संविधान दिनाचे महत्त्व आणि भरतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य व मूलभूत हक्काविषयी माहिती दिली.
यावेळी तिन्ही बॅच चे विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा सावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अस्मिता जल्हारे यांनी केले..
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय परसोडे, आकाश वायवळ, सप्नील खिलारे,रामजी वायवळ ,प्रशांत खंदारे, रवी भदर्गे , प्रतिभा बोराडे स्वप्नाली भिसे ,कीर्ती यादव,सायली वाकळे व IBPS बॅच च्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले..